Manish Jadhav
आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ सज्ज झाला असून आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.
केवळ 14 वर्षांचा युवा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
विराट कोहलीने अंडर-19 यूथ वनडेमध्ये 978 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी वैभवला आता फक्त 6 धावांची गरज आहे.
विराटने 28 सामन्यांत ही धावसंख्या गाठली होती, तर वैभवने अवघ्या 18 सामन्यांत 54.05 च्या सरासरीने 973 धावा कुटल्या आहेत.
भारतीय अंडर-19 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1404 धावांचा विक्रम विजय जोल यांच्या नावावर आहे. हा आकडा पार करणारा वैभव एकमेव भारतीय ठरु शकतो.
या स्पर्धेत जर वैभवने 400 हून अधिक धावा केल्या, तर तो शुभमन गिल आणि यशस्वी जायसवाल यांसारख्या मोठ्या खेळाडूंनाही मागे टाकेल.
सध्याचा फॉर्म पाहता वैभवसाठी एकाच स्पर्धेत 400 धावा करणे कठीण वाटत नाही, ज्यामुळे तो भारताचा सर्वात यशस्वी युवा फलंदाज बनू शकतो.
लहान वयातच दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढणारा वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे.