Best Trail In Goa: ट्रेकप्रेंमींसाठी गोवा आहे परफेक्ट ठिकाण, 'इथे' करा भटकंती

गोमन्तक डिजिटल टीम

निसर्गरम्य गोवा

पावसाळयानंतर हिरवाईने नटलेला गोवा पर्यटकांचे लक्ष वेधू लागतो. निसर्गात रमणाऱ्या लोकांसाठी हा काळ म्हणजे पर्वणीच असते.

River

भ्रमंतीसाठी ठिकाणे

गोव्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध होत असणारी अनेक ठिकाणे आहेत. यातील एका ठिकाणाची आपण भ्रमंती करू.

Waterfall

वाघेरी परिसर

प्रत्येक निसर्गवेड्याने पाहावा असा हा परिसर आहे. वाघेरी टेकडी आणि आसपासचे जंगल भटकताना तुमचा दिवस आनंदात जाऊ शकतो.

Trekking

उंच ठिकाण

हा परिसर गोव्यातील सर्वोच्च उंचीच्या ठिकाणांपैकी एक आहे. या टेकडीवरून दिसणारे नयनररम्य दृश्य या परिसराला आणखी खास बनवते.

Mountains

सात किलोमीटर ट्रेक

हा हिरव्यागार टेकड्यांनी नटलेला ट्रेक जवळपास सात किलोमीटरचा आहे. या परिसरात तुम्हाला अनेक औषधी वनस्पती पाहायला मिळतात.

Trekking

कसे जाल

चोर्ला घाटातून तुम्हाला वाघेरी डोंगरात जावे लागते. गोव्यातून चोर्लाकडे जाणाऱ्या बसेस उपलब्ध आहेत. तुम्ही खासगी वाहनानेही जाऊ शकता.

Ghat Road

योग्य वेळ

या ट्रेकसाठी हिवाळा उत्तम काळ मानला जातो. ऑगस्ट अखेर ते जानेवारीपर्यंत हा ट्रेक तुम्हाला करता येईल.

Nature Trail

बंगळुरू ते गोवा एक अद्भुत सफर

Coastal Road
आणखी पाहा