दैनिक गोमन्तक डिजिटल
सणासुदीच्या काळात घरोघरी गोडपदार्थ तयार केले जातात.
जिभेवर गोडवा आणणारे हे पदार्थ तयार केल्यावर भांडी स्वच्छ करणं हे आव्हानच.
कधी कधी पदार्थ फसतात. चव चाखता येत नाही. उलट किचन साफ करण्यात वेळ जातो.
गुलाबजामपासून सोनपापडी या पदार्थांसाठी साखरेचा पाक लागतो.
साखरेचा पाक भांड्याला चिकटून राहतो आणि साबणाने धुतल्यावरही जात नाही.
अशा वेळी भांड्यात पाणी टाकावं आणि काही काळ गॅसवर मंद आचेवर ठेवावं.
पाणी गरम झाल्यावर साखर वितळते आणि भांडी स्वच्छ होतात.
ऐवढं करूनही काही होत नसेल तर मीठ, बेकिंग सोडा आणि लिक्वीड सोप टाका.
पाणी उकळेपर्यंत गॅसवर ठेवा. तुमचं भांडं स्वच्छ झालेलं असेल.