Manish Jadhav
इस्रायल आणि हमास गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
या युद्धात अमेरिका इस्रायलच्या पाठिशी आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आता पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गाझामध्ये जे काही सुरु आहे तो ‘नरसंहार’ नाही.
इस्त्रायली सैन्याने राफाह शहरावर नुकताच मोठा हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राफाहमधील कारवाईमुळे इस्रायलचा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करण्याबाबत भाष्य केले होते.
काही दिवसांपूर्वी एका अमेरिकन सिनेटरने (Lindsey Graham) इस्रायलला अणुबॉम्ब देण्यासंबंधी भाष्य केले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाची तुलना त्यांनी दुसऱ्या महायुद्धाशी केली होती.
ते (Lindsey Graham) पुढे म्हणाले होते की, ‘इस्रायल युद्ध हरु शकत नाही.’ 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून दोघांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे.
बायडन यांनी अलीकडेच इस्रायलला 3 हजार बॉम्बची डिलिव्हरी थांबवल्याचे वृत्त आले होते. इस्रायलने राफाहमध्ये मोठी कारवाई सुरु केल्यास आणखी शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला जाईल, अशी शपथही त्यांनी घेतली आहे.