Sameer Panditrao
ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक व्यवहारांबाबतचे काही नियम बदलण्यात आले आहेत.
यात प्रामुख्याने ‘यूपीआय’चा वापर, फास्टॅग वार्षिक पास, क्रेडिट कार्ड सुविधा आदींचा समावेश आहे.
‘यूपीआय’ वापराबाबत एक ऑगस्टपासून काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
‘यूपीआय’ वापरकर्ते आता दररोज ५० वेळाच आपल्या खात्यातील शिलकीची चौकशी करू शकतील.
व्यवहार पूर्ण झाला की नाही, याची माहिती जास्तीत जास्त तीन वेळा घेता येईल. दोन चौकशीमध्ये किमान ९० सेकंदाचे अंतर (गॅप) असले पाहिजे.
ईएमआय, उपयोगी सेवांची बिले, सबस्क्रिप्शन यांसारखी आपोआप (ऑटो) होणारी पेमेंट ‘यूपीआय’चे व्यवहार ज्यावेळी कमी होतात, त्यावेळी केले जातील.
या बदलांमुळे प्रणालीवरील ताण कमी होऊन, अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम प्रक्रियेद्वारे पेमेंटमध्ये होणारी दिरंगाई, आणि अयशस्वी व्यवहारांचे प्रमाण कमी होईल.