Sameer Panditrao
शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे राजे होते हे आपणास माहिती आहेच.
स्वराज्य उभारणी करताना सोबतच्या सैन्यासोबत त्यांनी एक महत्वाचे धोरण राबवले.
शेती, शेतकरी, अन्नधान्य निर्मिती याबाबत हे दूरगामी धोरण होते.
'प्रथम हाती धरा नांगर नंतर चालवा तलवार' या वाक्यानुसार त्यांनी स्वराज्यात शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवल्या.
'आधी भरा पोट आणि मग करा गनिमावर वार' याप्रमाणे त्यांनी सतत सैन्याला अन्नधान्याची कमी पडू नये याची काळजी घेतली.
अर्धपोटी सैन्य कधीच प्राणपणे लढा देऊ शकत नाही हे महाराजांनी जाणले होते.
हे ओळखूनच भूमिपुत्राच्या हातात प्रथम नांगर देऊन स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राजे होते.