गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात एक गणपती असाही आहे ज्याची पूजा चतुर्थी दिवशी नाही तर चतुर्थी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी केली जाते.
मौळे गावातील या गणपतीला बालगणेश म्हटलं जातं किंवा स्थानिक याला राखणीचा गणपती असं देखील म्हणतात.
दीड आणि पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर स्थानिक लहान मुलं या गणपतीची पूजा करतात.
मौळे गावातील ७-८ मुलांकरवी या प्रथेची सुरूवात झाली होती.
नंदेश नाईक आणि मित्रांनी विसर्जन केलेल्या गणपतीच्या चिकणमातीपासून नवीन मूर्ती घडवली.
सगळ्यात पहिल्यांदा या गणपतीची पूजा जवळच्या एका गोठ्यात करण्यात आली होती. हळूहळू गणपती प्रचलित झाला, भक्त फुलं आणि हार अर्पण करु लागले आणि आज हा गणपती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.