गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील जुन्या मंदिरांना भेट दिल्यास भिंतीवर कावि कलाकृती पाहायला मिळते. कवी आर्ट म्हणजे शतकांपासून जोपासलेला कलाविष्कार होय.
गोव्यातील हवामान दमटीचे असते आणि यामुळे घरच्या भिंतींचे तुकडे/पापुद्रे निघतात, यालाच थोपवून धरण्यासाठी कावि रंग आणि चित्रांची सुरुवात झाली.
काळ्या खुब्यांना शिजवून पांढरा चुना तयार केला जातो, पुढे गुळात वाळू मिसळून हे मिश्रण आंबवलं जातं. हे मिश्रण मुसळाने कांडून भिंतीवर लावलं जातं आणि पुढे कविच्या रंगाने चित्रं रंगवली जातात.
आज फोंडयातील विजयादुर्गा,पेडण्यातील मोरजाई किंवा अडवलपाल येथील हनुमान मंदिरात आधुनिक रंगांच्या मदतीने कावि आर्ट रेखाटलेले आढळते.
केवळ मंदीरांमध्येच नाही तर मोठाल्या वाड्यांमध्ये कावि चित्रकला आढळते. साखळीतील राणे किंवा डिचोलीतील लामगावकर याची प्रमुख उदाहरणे आहेत.
माती, दगड, शिंपले, वाळू यांपासून बनवलेली चित्रे अनेक काळ भिंतींवर पाहायला मिळतात.
मंदिरांचा जीर्णोद्धार आणि बाकी बदलांमुळे ही चित्रकला लोप पावण्याच्या मार्गावर आहे.