गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी केली जाते
गोव्यात गणेश पूजनाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. चिकणमाती किंवा शाडू वापराव्यतिरिक्त होणाऱी ही एक खास परंपरा आपण जाणून घेऊ.
पैंगीण येथे पाना, फुलांत म्हणजे पत्रीत गणेश रूप पाहून पत्रीचा गणपती पूजला जातो.
महत्वाची बाब म्हणजे या सर्व वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आहेत
एकवीस पत्रीची पाने आणून त्यांच्या गौरी व श्री गणपतीच्या अशा वेगवेगळ्या पुड्या बांधतात.
पोर्तुगिजांच्या नजरेपासून वाचण्यासाठी सुरु झालेली ही परंपरा गेल्या तीन पिढ्यांपासून सुरु आहे.
सर्व औषधी वनस्पतीचे विसर्जन केले जाते, गौरी- महादेवाची पुडी उघडून नारळासह विहिरी जवळच्या झाडाखाली त्यांचे विसर्जन करतात.