''PM मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला...''

Manish Jadhav

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरात दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी गुजरातमधील साणंद येथे विकास भारत संकल्प यात्रेदरम्यान जनतेला संबोधित केले.

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

अमित शाह म्हणाले...

अमित शाह म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना गुजरातमधील दंगलखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत राज्यात पुन्हा दंगल घडवण्याचे धाडस कोणी केले नाही.''

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

मोदीजींनी धडा शिकवला

शाह म्हणाले की, “2002 मध्ये दंगल झाली आणि त्यानंतर पुन्हा असे होऊ नये यासाठी मोदीजींनी धडा शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगलखोरांना असा धडा शिकवला गेला की, आजपर्यंत गुजरातमध्ये दंगल करण्याचे धाडस कोणाचे झाले नाही.''

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

2047 पर्यंत भारत विकसीत देश बनणार!

साणंद ग्रामपंचायतीतील एका कार्यक्रमात बोलताना शाह यांनी अनेक महत्त्वाची विधाने केली. गुलामगिरीची मानसिकता उखडून टाकण्याबरोबरच शाह म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे.

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

सरदार पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण

शाह म्हणाले की, “मोदीजींनी सरदार पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न एका झटक्यात पूर्ण केले…''

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

राम मंदिर बांधण्याचा निर्धार

भगवान राम 500 वर्षांपासून तंबूत राहत होते, परंतु त्यांच्यासाठी मंदिर बांधता आले नाही. नरेंद्रभाईंनी मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले, असेही शाह म्हणाले.

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak

देशाची आर्थिक स्थिती

पंतप्रधान मोदींनी आर्थिक आघाडीवरही देशाला एक नव्या उंचीवर नेले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व पॅरामीटर्स गेल्या 75 वर्षातील सर्वोत्तम स्तरावर आहेत. 10 वर्षांचे अंतर पाहिले तर नरेंद्रभाईंच्या कार्यकाळात सर्वाधिक औद्योगिक विकास झाला आहे,'' असेही शाह म्हणाले.

Union Home Minister Amit Shah | Dainik Gomantak