Sameer Amunekar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडला. सलग आठव्यांदा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकरानं गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं.
LED-LCD च्या किंमती कमी होणार तसंच टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार आहेत.
देशांतर्गत मोबाईल फोनचे उत्पादन वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरून मोबाईल फोनदेखील स्वस्त होणार आहे. अर्थसंकल्पात मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट देण्यात आलीय.
कर्करोगाची आयात होणारी औषधं महाग असतात. अशा काही औषधांवरील सीमाशुल्क रद्द करण्यात येणार आहे.
भारतात तयार केलेली कपडे स्वस्त होणार आहेत. कापड उद्योगाला चालना देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे.
तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.