Sameer Panditrao
जगभरात अद्यापही १३.३ कोटी मुली शालेय शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
सन १९९५ मध्ये बीजिंग जाहीरनामा आणि कृती कार्यक्रमाने याबाबत महत्त्वपूर्ण कार्यक्रम जगभर राबविला.
जागतिक स्तरावर ९.१ कोटी अधिक मुली प्राथमिक शिक्षण घेत आहेत, तर १३.६ कोटी अधिक मुली माध्यमिक शिक्षण घेत आहेत, असे ‘जीईएम’ विभागाने सांगितले.
महिलांच्या तिसऱ्या टप्प्यातील शिक्षणाची नोंदणी तीनपटीने वाढली आहे. ४.१ कोटी ते १३.९ कोटी अशी नोंद झाली आहे.
लैंगिक शिक्षण प्राथमिक स्तरावर सुमारे दोन-तृतीयांश देशांमध्ये आणि माध्यमिक स्तरावर सुमारे तीन-चतुर्थांश देशांमध्ये अनिवार्य आहे.
शिक्षकांमध्ये महिलांचे बहुमत असले, तरी नेतृत्वात त्यांचे प्रतिनिधित्व अपुरे आहे.
जगभरातील उच्च शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थांमध्ये केवळ ३० टक्केच महिला आहेत.