Sameer Panditrao
भारतीय फूल शेतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोहोर उमटविली आहे.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत देशातून तब्बल २१ हजार २४ टन फुले व त्यांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे.
यातून देशाला ७४९ कोटी रुपयांचे परकी चलन मिळाले आहे.
ही आकडेवारी फूल उद्योगाच्या सातत्यपूर्ण वाढीचे निदर्शक मानली जात आहे.
फुलांची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल असून, विशेषतः नाशिक जिल्हा हे फूल शेती आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
लासलगाव, दिंडोरी, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये गुलाब, झेंडू, ग्लॅडिओलस आणि रजनीगंधा यासारख्या फुलांची व्यावसायिक पातळीवर शेती केली जाते.
गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, मोगरा, ट्युलिप आणि झेंडू या फुलांना परदेशात मोठी मागणी आहे.