Manish Jadhav
भारताने गेल्या काही वर्षांमध्ये दारिद्र निर्मूलनात अतुलनीय काम केले आहे. होय, खुद्द संयुक्त राष्ट्राने भारताने केलेल्या कामाची प्रशंसा केलीय.
संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, 2005-2006 आणि 2019-2021 या दरम्यान देशातील (India) गरीब लोकांची संख्या तब्बल 41.5 कोटींनी कमी झालीय.
भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची गरिबी पातळी MPI द्वारे मोजली जाते. त्यानुसार, बिहार हे भारतातील सर्वात मागासलेलं राज्य आहे.
बिहारनंतर झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. बिहार हे 51.9 टक्क्यासह देशातील सर्वात गरीब राज्य आहे.
देशात गोव्यासह महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, आणि राजस्थान या राज्यांमध्ये गरिबीत झपाट्याने घट झालीय.
देशात सर्वात कमी गरिबी केरळमध्ये आहे. केरळमध्ये केवळ 0.71 टक्के लोक दारिद्ररेषेखाली राहतात. तर गोव्यात हेच प्रमाण 3.76 टक्के आहे. यानंतर सिक्कीम, तामिळनाडू आणि पंजाबचा क्रमांक लागतो.