Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणं काय, संसर्ग झाल्यास काळजी कशी घ्यावी?

Manish Jadhav

मंकिपॉक्सची दस्तक

कोरोनाच्या सावटातून जग काहीसं सावरलं असतानाच 'मंकिपॉक्स'ने दस्तक दिली आहे.

Monkeypox | Dainik Gomantak

मंकिपॉक्सचा धोका

गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये आढळून आलेल्या मंकीपॉक्सच्या प्रकरणांमुळे विविध देशांतील सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांची चिंता वाढली आहे.

Monkeypox | Dainik Gomantak

भारतासाठी चिंतेची बाब

जगभरात वाढत असलेल्या मंकिपॉक्सच्या प्रकरणांमुळे भारतातही सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण शेजारी देश पाकिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे.

Monkeypox | Dainik Gomantak

काय आहेत लक्षणे

मंकीपॉक्स आजारात ताप, लसिका ग्रंथी सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी एक वा अनेक लक्षणे दिसतात.

Monkeypox | Dainik Gomantak

सौम्य स्वरुपाचा आजार!

मंकिपॉक्स हा सौम्य स्वरुपाचा आजार असून 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये आणि इतर काही जोखमीतील रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो.

Monkeypox | Dainik Gomantak

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळे होतो, त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे.

Monkeypox | Dainik Gomantak

मंकीपॉक्स झाल्यास काळजी कशी घ्यावी?

लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात यावा. दुय्यम बॅक्टेरिअल संसर्ग असल्यास त्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत. पोषक आहार देण्यात यावा.

Monkeypox | Dainik Gomantak

मंकीपॉक्सवर उपचार काय?

सध्या या आजारावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटीव्हायरल आणि व्हीआयजी यांचा वापर केला जाऊ शकतो.

आणखी बघण्यासाठी