Sameer Panditrao
उमंगोट नदीचे पाणी काचेसारखे पारदर्शक आहे त्यामुळे नदीचा तळ सहज दिसतो.
ही नदी मेघालयात, शिलाँगपासून (Shillong) सुमारे 95 किलोमीटर अंतरावर आहे.
नदीतील पाणी इतके स्पष्ट आहे की, बोटी हवेत तरंगत आहेत, असा भास होतो.
या नदीत अजिबात प्रदूषण नाही, ज्यामुळे तिचे पाणी स्वच्छ, निर्मळ राहते.
या नदीत विविध प्रकारचे मासे आणि इतर जलचर प्राणी आढळतात.
उमंगोट नदी पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. पर्यटक येथे बोटिंगसाठी, सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येतात.
उमंगोट नदी मॉयलननोंग गावाला लागून आहे.