Sameer Amunekar
देशात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे अनेक धबधबे कोरडे पडलेले दिसत आहेत.
अहिल्यानगर येथील प्रसिद्ध 'अंब्रेला धबधवा' मात्र, भर उन्हाळ्यातही प्रवाहित असून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
'अंब्रेला फॉल' किंवा 'अंब्रेला धबधबा' हा भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ वसलेला एक निसर्गरम्य धबधबा आहे.
धबधब्याची वैशिष्ट्यं म्हणजे या धबधब्याची रचना छत्रीच्या आकाराची आहे. पाण्याचा पडणारा प्रवाह आणि त्याचा गोलसर पसरलेला विस्तार यामुळं धबधब्याला 'अंब्रेला' हे नाव मिळालं आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी हा धबधबा एक खास आकर्षण बनला आहे.
अंब्रेला फॉल हा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक विशेष ठिकाण बनलं आहे. धबधब्याच्या आसपासची हिरवाई, शांत वारे आणि पाण्याचा थंडावा यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही येथे आल्हाददायक वातावरण अनुभवता येते.