Sameer Amunekar
गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे पर्यटकांसाठी स्वर्गच. बागा, कळंगुट, हणजूण, पाळोले हे सुंदर किनारे येथे पाहायला मिळतात. स्वच्छ वाळू, निळसर पाणी आणि सूर्यास्ताचा मोहक नजारा पर्यटकांसाठी वेड लावतो.
गोव्यातील सी-फूड, खास गोव्याचे फिश-कार्री (मच्छी-आंबट टिक) जगप्रसिद्ध आहेत. तसेच "बेबिंका"सारख्या पारंपरिक गोड पदार्थांनी प्रत्येकाचे मन जिंकले जातं.
गोवा फक्त समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही, तर त्याच्या समृद्ध इतिहासासाठीही ओळखला जातो. बॉम जीझस बॅसिलिका, सेंट कॅथेड्रल चर्च तसेच तांबडी सुर्ला आणि मंगेशी मंदिर यासारखी प्राचीन स्थळे पर्यटकांना भुरळ घालतात.
जेट स्कीइंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर बोट रायड्स, पारासेलिंग यांसारख्या साहसी खेळांसाठी गोवा म्हणजे एक हॉटस्पॉट. थोडासा थरार अनुभवायचा असेल तर गोव्यातील जलक्रीडा अवश्य अनुभवावी.
गोव्याचे नाईटलाइफ म्हणजे संगीत, नृत्य, आणि मोकळेपणाचा जल्लोष. तसेच गोवा कार्निव्हल, संजोत्सव यासारखे पारंपरिक उत्सव पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात.
गोव्यातील या 5 गोष्टी, ज्या देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालतात.