'डिंगा डिंगा' आजारानं या देशात उडवला हाहाकार! जाणून घ्या काय आहे हा आजार?

Manish Jadhav

‘डिंगा डिंगा’ आजार

आफ्रिकेतील युगांडामध्ये जवळपास 300 लोक एका गूढ आजाराचे बळी ठरले आहेत. या आजाराला ‘डिंगा डिंगा’ असे नाव देण्यात आले आहे.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

महिला आणि मुलींना आजार

IANS च्या रिपोर्टनुसार, हा आजार प्रामुख्याने महिला आणि मुलींना होतो. या आजारामुळे खूप ताप येतो आणि शरीरही सतत थरथरत राहते. म्हणून सीडीसीने या आजाराला 'डिंगा डिंगा' म्हणजेच नाचण्याचा आजार असे नाव दिले आहे.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

एंटीबायोटिक

आफ्रिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कियिता क्रिस्टोफर यांनी सांगितले की, या आजारावर सध्या एंटीबायोटिकनी उपचार केले जात आहेत.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

अद्याप मृत्यूची नोंद नाही!

आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. हा आजार कसा आला आणि तो का पसरत आहे, याची अचूक माहिती अद्याप आरोग्य विभागाला मिळालेली नाही.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

रुग्ण बरे होतात

तथापि, सध्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मध्ये डिंगा डिंगा रोगाचे रुग्ण सामान्यतः बरे होत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, येथे 394 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

लक्षणे

1) ताप 2) डोकेदुखी, 3) खोकला, 4) नाक वाहणे, 5) अंगदुखी

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

हा रोग का पसरत आहे?

आफ्रिकेचा आरोग्य विभाग डिंगा, डिंगा या आजाराच्या प्रसाराच्या कारणाचा तपास करत आहे. इन्फ्लूएन्झा, कोविड-19, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराचे कारण आहेत का, याचा शोध घेतला जात आहे, मात्र सध्या डिंगा, डिंगा या आजाराच्या प्रसाराची कारणे समजू शकलेली नाहीत.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak

सतर्कता

ज्या भागात हा आजार पसरत आहे त्या भागातील लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हा आजार सांसर्गिक मानला जातो आणि त्याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त केली जाते.

Dinga Dinga Disease | Dainik Gomantak
आणखी बघा