Manish Jadhav
हृतिक रोशन त्याच्या अफलातून डान्स मूव्ह आणि खतरनाक स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतो. यातच, हृतिक अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'फायटर' अभिनेता हृतिक रोशनने 2014 मध्येच सुजैन खानपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर 2022 मध्ये सबा आझाद त्याच्या आयुष्यात आली. दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं हृतिक आणि सबानं सांगितलं होतं, पण आजतागायत हृतिक रोशन आणि सबा आझादच्या लग्नाची बातमी ऐकायला मिळत नाहीये.
अलीकडेच हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी हृतिक रोशन आणि सबाच्या लग्नात काय समस्या येत आहेत याचा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, गेल्या वर्षभरापासून प्लॅनिंग सुरु आहे, पण हृतिक अजून लग्नासाठी तयार नाही.
'ग्रीक ऑफ गॉड' या नावाने प्रसिद्ध असलेल्या हृतिकच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाने एका रात्रीत त्याचे नशीब पालटले.
चित्रपट दिग्दर्शक आणि हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी शाहरुख खानला 'कहो ना प्यार है'साठी ऑफर दिली होती, पण नंतर जेव्हा शाहरुखला चित्रपटाची कथा आवडली नाही, तेव्हा राकेश रोशन यांनी विचार केला की हृतिक रोशनसोबत हा चित्रपट का करु नये. तो बनवला गेला आणि सुपरहिटही ठरला.
हृतिक रोशन पहिल्यांदा 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'आशा' चित्रपटात पडद्यावर दिसला होता, जेव्हा हृतिक फक्त 6 वर्षांचा होता आणि त्याच्या आजोबांवर हा चित्रपट बनवला गेला होता.
हृतिकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. हृतिक जेव्हाही त्याच्या वडिलांच्या चित्रपटाच्या सेटवर जायचा तेव्हा तो कॅमेरा घेऊन शूटला जायचा आणि अनेकदा आरशासमोर बसून अभिनयही करायचा.