Goan Houses: गोव्यातील घरं लयच भारी.. निसर्गाचं लालित्य लाभलंय

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात घरं कशी आहेत?

गोव्याबद्दल आपल्याला विशेष आकर्षण असतं. छोटंसं राज्य पण तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल तितकंच कुतूहल वाटतं. गोव्यात राहणारी लोकं कशी असतील किंवा कशा घरांमध्ये राहत असतील?

पोर्तुगीजांचे अवशेष असतील का?

इतिहास सांगतो गोव्यात अनेक वर्ष पोर्तुगीजांची सत्ता होती, मग आज सुद्धा त्याच पोर्तुगीजांचे अवशेष कायम असतील का? याच प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊया..

वडिलोपार्जित घर

तर गोव्यात आजही काही लोकं कौलारू घरांमध्ये राहतात, हे त्यांचं वडिलोपार्जित घर असतं आणि शेणाने सारवलेल्या जमिनीवर आजही संसार उभा राहतो.

आधुनिक घरं

काही ठिकाणी तुम्हाला सिमेंटची आधुनिक घरं पाहायला मिळतील. नवीन आकार दिलेली, रंगेबिरंगी आणि भली मोठी. या घरांच्या समोर एक तुळशी वृंदावन मात्र क्रॉस कायम असतो.

बिल्डिंग

गोव्यातील काही लोकं बिल्डिंगमध्ये राहतात. दोन ते तीन खोल्यांच्या या घरात एक परिवार सहज राहतो. मात्र अशी घरं गावांमध्ये नाही तर वास्को, मडगाव, पणजी यांसारख्या शहरांमध्ये पाहायला मिळतात.

रोहाऊस

गोव्यात काही ठिकाणी रोहाऊस पद्धत देखील आहे. जिथे एका सामान आकाराची घरं रांगेत उभी दिसतात.

पोर्तुगीजकालीन घरं

सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आजही काही पोर्तुगीजकालीन घरं आहेत. समोर पाण्याचा साठा आणि पोर्तुगीज काळातील बांधणी.

आणखीन बघा