Goa Bus Stops: अजब-गजब! गोव्यातील बस स्टॉपची नावं ऐकून व्हाल अवाक

गोमन्तक डिजिटल टीम

बसचा प्रवास

गोव्यात फिरायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बसचा प्रवास. गोव्यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारची बससेवा उपलब्ध असतात आणि म्हणून स्वतःची गाडी नसली तरीही फारशी गैरसोय होत नाही.

महत्वाच्या गोष्टी

किंवा तुम्ही एक वेगळा अनुभव म्हणून गोव्यात बसचा प्रवास करणार असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

अनोखे बस स्टॉप

गोव्यातल्या बसेस केवळ बस स्टॉप किंवा बस स्टॅन्डवर थांबतात असं नाही तर याशिवाय देखील गोवेकरांनी काही अनोखे बस स्टॉप तयार केलेत.

कोणी तयार केलेत?

गोव्यात हे बस स्टॉप कधीपासून तयार झालेत किंवा कोणी तयार केलेत याची माहिती कोणालाही नाही. मात्र तरीही या जाग्यांवर बस हमखास थांबते त्यामुळे तुम्हाला ही नावं माहिती पाहिजेत.

साखळे पुलार

साखळीच्या पुलावर जर का बस थांबवायची असेल तर या बस स्टॉपला पुलार (पुलावर) असं नाव देण्यात आलंय. किंवा वाळपईमधल्या हॉस्पिटल जवळ उतरायचं असेल तर हॉस्पिटलाकडे असं सांगून बस थांबवता येते.

वडाकडे

याशिवाय कोर्टाकडे, हाथीकडे, बायकडे, स्कुलाकडे, मठाकडे,वडाकडे अशा वेगवेगळ्या बस स्टॉपचा वापर केला जातो.

नावं पाठ करा

गोव्यातले बस चालक हमखास या जागांवर थांबतात त्यामुळे गोव्यात जात असाल तर ही नावं नक्कीच पाठ करून ठेवा.

आणखीन बघा