Sameer Amunekar
गोवा म्हटलं की डोळ्यांपुढे उभं राहतं तेथील नितांतसुंदर समुद्रकिनारे, निळ्याशार पाणी, आणि निसर्गरम्य दृश्यं. मात्र, गोव्यातील काही ठिकाणं अशीही आहेत जी फारशी प्रसिद्ध नाहीत.
दक्षिण गोव्यातील काकोळे बीच (Kakolem Beach) एक शांत, निवांत आणि निसर्गसंपन्न समुद्रकिनारा, जिथे तुम्हाला एक अद्वितीय अनुभव मिळतो. येथे समुद्रकिनाऱ्यावरचं धबधब्यांचं दर्शन होतं.
काकोलेम बीचचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या किनाऱ्यावर थेट पडणारे दोन धबधबे. हे धबधबे थेट समुद्राच्या दिशेने वाहताना दिसतात, आणि त्यामुळे हा समुद्रकिनारा जास्त आकर्षक वाटतो.
समुद्रकिनारा आणि धबधबे असं निसर्गाचं दोन सुंदर रूप एकत्रितपणे येथे पाहायला मिळतं.
हे धबधबे मात्र फक्त पावसाळ्याच्या काळातच प्रवाहित असतात. जून ते सप्टेंबर हा कालावधी या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
गोव्यात काही वेगळं, शांत आणि निसर्गरम्य ठिकाण शोधायचं असेल, तर काकोलेम बीच हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. पावसाळ्यात या धबधब्यांचं सौंदर्य अनुभवायला विसरू नका.