Pramod Yadav
दोन दिवसात गोवा फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला उत्तर गोव्यात दोना पाऊला जेट्टीला भेट देऊन प्रवास सुरु करता येईल. सिंघम चित्रपटाचे येथेट शूट झाले होते.
त्यानंतर ओल्ड गोव्यात प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बॉम जिसस चर्चला भेट देता याचजवळ असलेल्या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयाला देखील भेट देता येईल.
त्यानंतर बीच पाहण्यासाठी सर्वात प्रसिद्ध कळंगुट बीचला भेट देता येईल, येथे सुट्टीचा मनमुराद आनंद घेता येईल
गोव्यातील नाईट लाईफ अनुभवायची असल्यास विविध स्पॉट आहेत पण कळंगुट-बागा येथील टीटोज लेन खूप प्रसिद्ध आहे.
उत्तर गोव्यात असताना मंगेशी देवस्थानाला भेट द्यावीच लागेल, मंगेशी गोव्यातील प्रसिद्ध देवस्थानापैकी एक आहे.
त्यानंतर दक्षिण गोव्यात नव्याने झालेल्या बालाजी मंदिराला भेट देता येईल.
दक्षिण गोव्यातच मडगाव शहर आणि खरेदीसाठी येथील प्रसिद्ध मार्केटला भेट देता येईल.