TVS Scooter: ओलाला टक्कर देणार टीव्हीएसची 'ऑर्बिटर'; आयक्यूबपेक्षा कमी किमतीत होणार लाँच

Manish Jadhav

टीव्हीएसची नवी इलेक्ट्रिक स्कूटर

TVS खूप लवकरच भारतीय बाजारात एक नवीन आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी 'ऑर्बिटर' या नावाने ट्रेडमार्क नोंदणी केली.

TVS Scooter | Dainik Gomantak

लॉन्चची तारीख

TVS ऑर्बिटर ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 28 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे. हे मॉडेल TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओमधील नवीन एंट्री-लेव्हल मॉडेल ठरेल.

TVS Scooter | Dainik Gomantak

आयक्यूबपेक्षा स्वस्त

लाँच झाल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर TVS च्या यशस्वी iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या श्रेणीत येईल. TVS iQube ची किंमत सुमारे 1 लाख रुपयांपासून सुरु होते.

TVS Scooter | Dainik Gomantak

किंमत 1 लाखापेक्षा कमी

आगामी TVS ऑर्बिटरची किंमत TVS iQube पेक्षा कमी असेल. त्यामुळे ही स्कूटर 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

TVS Scooter | Dainik Gomantak

स्कूटरशी स्पर्धा

भारतीय बाजारात लाँच झाल्यावर TVS ऑर्बिटर थेट बजाज चेतक आणि ओला S1 X सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरसोबत स्पर्धा करेल.

TVS Scooter | Dainik Gomantak

उत्तम वेळ साधली

या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची लाँचिंग गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर होत आहे, ज्यामुळे कंपनीला विक्रीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

TVS Scooter | Dainik Gomantak

प्रीमियम डिझाइन आणि फीचर्स

इंडोनेशियामध्ये दाखल केलेल्या पेटंटनुसार या स्कूटरला स्लीक स्टायलिंग, मोठे व्हील्स आणि स्विंगआर्म-माउंटेड मोटर मिळेल. यात एलईडी हेडलाइट्स आणि फ्रंट डिस्क ब्रेक सारखी फीचर्स आहेत.

TVS Scooter | Dainik Gomantak

अधिकृत माहितीची प्रतीक्षा

जरी या स्कूटरची डिझाइन समोर आली असली तरी TVS कंपनीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, हे पेटंट ऑर्बिटर मॉडेलचेच असण्याची शक्यता आहे.

TVS Scooter | Dainik Gomantak

Mahindra Thar SUV: आधुनिक आणि दमदार! नवीन महिंद्रा थार लवकरच बाजारात; डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल

आणखी बघा