Tulsi Plant Care: तुळशीची पानं गळतायत, रोप सुकतंय? पावसाळ्यात 'या' चुका टाळा आणि करा सोपे उपाय; तुळस होईल डेरेदार

Sameer Amunekar

पाणी साचू देऊ नका

पावसाळ्यात तुळशीला वारंवार पाणी देण्याची गरज नसते. कुंडीत पाणी साचल्यास मुळं कुजण्याची शक्यता असते.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

कुंडीला योग्य ड्रेनेज द्या

कुंडीच्या तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रं असणं आवश्यक आहे. पाणी साचत असेल तर कुंडी बदला.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

कुंडी योग्य ठिकाणी ठेवा

तुळशीला सूर्यप्रकाशाची गरज असते. पावसाळ्यातही रोज काही तास अप्रत्यक्ष किंवा सौम्य सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी रोप ठेवा.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

पिवळी आणि सुकलेली पानं काढा

गळलेली, पिवळी किंवा खराब झालेली पानं नियमितपणे काढून टाका. त्यामुळे झाडाची ऊर्जा नवीन पालवी वाढवण्यासाठी वापरली जाते.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

मातीचा पोत हलका ठेवा

चिकट आणि पाणी धरून ठेवणारी माती टाळा. मातीमध्ये कोकोपीट, वाळू किंवा सेंद्रिय खत मिसळल्यास निचरा चांगला होण्यास मदत होते.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

सेंद्रिय खताचा वापर करा

तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी महिन्यातून एकदा थोडं कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं सेंद्रिय खत वापरू शकता. अति खत देऊ नका.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

शेंड्यांची छाटणी करा

तुळशीच्या रोपाची वरची वाढलेली टोकं हलकी छाटल्यास बाजूच्या फांद्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोप अधिक डेरेदार आणि दाट दिसू शकतं.

Tulsi Plant Care | Dainik Gomantak

काश्मिरी मुलींसारखी नैसर्गिक गुलाबी चमक हवी? 'हा' उपाय करा

येथे क्लिक करा