Natural pink blush: काश्मिरी मुलींसारखी नैसर्गिक गुलाबी चमक हवी? 'हा' उपाय करा, चेहऱ्यावर दिसेल सुंदर ग्लो

Sameer Amunekar

गुलाबी ग्लोसाठी घरगुती उपाय

चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक हवी असेल तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही साध्या पदार्थांचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता.

Natural pink blush | Dainik Gomantak

बीटचा रस ठरू शकतो फायदेशीर

बीटमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचा थोडासा रस त्वचेच्या काळजीसाठी वापरला जातो.

Natural pink blush | Dainik Gomantak

बीट + दही असा तयार करा पॅक

एका वाटीत 1 चमचा बीटचा रस आणि 1 चमचा साधं दही घ्या. दोन्ही पदार्थ चांगले मिसळून पेस्ट तयार करा.

Natural pink blush | Dainik Gomantak

चेहऱ्यावर कसा लावायचा?

चेहरा स्वच्छ धुऊन ही पेस्ट हलक्या हाताने लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा आणि साधारण 10-15 मिनिटे पॅक ठेवून द्या.

Natural pink blush | Dainik Gomantak

नंतर चेहरा स्वच्छ धुवा

पॅक पूर्णपणे कोरडा होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. साध्या किंवा कोमट पाण्याने चेहरा हलक्या हाताने धुवा.

Natural pink blush | Dainik Gomantak

आठवड्यातून किती वेळा?

सुरुवातीला आठवड्यातून 1-2 वेळा हा उपाय करून पाहू शकता. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.

Natural pink blush | Dainik Gomantak

ग्लोसाठी फक्त पॅक पुरेसा नाही!

त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या, झोप पूर्ण करा आणि दिवसा सनस्क्रीन वापरणेही महत्त्वाचे आहे.

Natural pink blush | Dainik Gomantak

तुम्ही अजूनही सिंगल? कारण नशीब नाही, 'या' सवयी असू शकतात

येथे क्लिक करा