Sameer Amunekar
तुळशीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या संसर्गापासून बचाव होतो.
तुळशी रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते आणि हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवते. नियमित सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तुळशीमध्ये अँटी-स्ट्रेस गुणधर्म असतात. रोज तुळशीची पाने चावल्याने मानसिक तणाव, चिंता आणि थकवा कमी होतो.
तुळशीचे पानं खोकला, दम्याचे त्रास आणि श्वसनासंबंधी इतर समस्या कमी करण्यात मदत करतात.
तुळशीमध्ये रक्त शुद्ध ठेवण्याचे गुण आहेत. हे त्वचेवर देखील परिणाम करतात आणि त्वचा निरोगी राहते.
तुळशीची पाने पचनसंस्था सुधारण्यात मदत करतात, अपचन आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम मिळतो.
तुळशी रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही उपयुक्त आहे.