Sameer Amunekar
वजन कमी करताना कार्बोहायड्रेट पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. गव्हाच्या चपाटीत असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात व रक्तातील साखर स्थिर ठेवतात.
संपूर्ण गहू किंवा मल्टीग्रेन चपाटीत असलेले फायबर्स पचन सुधारतात व पोट भरल्यासारखे वाटते, जे जास्त खाणे टाळण्यास मदत करते.
वजन कमी करताना १-२ चपाट्या पुरेशा असतात. त्या सकाळी किंवा दुपारी खाल्ल्यास चांगले; रात्री उशिरा किंवा मोठ्या प्रमाणात चपाट्या टाळाव्यात.
चपाटीवर अतिरिक्त तुप, बटर किंवा तेल लावल्यास त्यातील कॅलोरी वाढते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होतो.
रिफाइंड पीठ किंवा मैद्याच्या चपात्या पचायला जड असतात व वजन वाढवू शकतात. त्यामुळे संपूर्ण गहू किंवा बाजरी, नाचणी यांच्यासारख्या हेल्दी पीठाच्या चपाट्या खा.
केवळ चपाटी खाल्ल्याने किंवा टाळल्याने वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या तिन्हींचा समतोल असणे आवश्यक आहे.