Akshata Chhatre
पर्यटकांना सांगितली जाणारी एक कथा अशी आहे की, दोना नावाची स्त्री आपल्या मच्छीमार पतीची वाट बघत खडकावर बसायची. तो परत आला नाही, म्हणून ती शेवटी दगडात बदलली.
दोना आणि पावला हे वेगळ्या जाती आणि देशांचे होते. प्रेम जुळत नाही म्हणून त्यांनी खडकावरून उडी मारली, आणि त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून पुतळा उभा केला.
खरं तर, "दोना" हा पोर्तुगीज भाषेत विवाहित स्त्रीसाठी वापरण्यात येणारा मानाचा शब्द आहे. पाउला अमारल अंतोनिओ द सोटो मायर हिचे हे खरे नाव होते.
ती पोर्तुगीज वायसरॉयची मुलगी होती. १६४४ मध्ये गोव्यात आली आणि १६५६ मध्ये स्पेनमधील एका सरदाराशी लग्न केले.
दोना पावलाचे कुटुंब गोव्यात अत्यंत श्रीमंत होते. भरपूर मोठी जमीन त्यांच्या मालकीची होती.
दोना पावला १६८२ मध्ये निधन पावली. तिची कथा रोमँटिक नसली तरी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. खऱ्या दोना पावलाची कहाणी ही गोव्याच्या वैभवाचा एक भाग आहे. आणि म्हणून गोव्यातील प्रसिद्ध जागेला हे नाव देण्यात आलंय.