Sameer Amunekar
गवती चहा अपचन, गॅस आणि पोटाच्या अन्य समस्यांसाठी फायदेशीर आहे.पचन क्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हा चहा फायदेशीर असतो. रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतो.
गवती चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. सर्दी, ताप आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करतो.
गवती चहा चयापचय (metabolism) वाढवतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो.
गवती चहा चयाच्या सुगंधामुळे मनःशांती मिळते आणि नैराश्य दूर होते. झोप सुधारते आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते.
गवती चहामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तो त्वचेच्या संक्रमणांवर उपयोगी ठरतो. मुरूम आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतो.