Sameer Amunekar
घराच्या भिंतींवर बुरशी येणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. यामुळे केवळ घराचं सौंदर्य कमी होतं असं नाही, तर आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
या वेबस्टोरीमध्ये काही सोप्या पण प्रभावी टिप्स दिल्या आहेत ज्या वापरून तुम्ही भिंतीवरील बुरशी हटवू शकता.
एक स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर (सिरका) भरून बुरशीवर फवारा. १ तास तसाच राहू द्या आणि नंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.
पाण्यात थोडं बेकिंग सोडा मिसळा, स्प्रे करा आणि कपड्याने पुसा. बुरशी हटवण्यासाठी हा खूप प्रभावी उपाय आहे.
ओलावा कमी करण्यासाठी डिह्युमिडिफायर किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करा.
शक्यतो खिडक्या उघडून घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येऊ द्या – यामुळे बुरशी वाढत नाही.