Savdav Waterfall In Konkan: धबधबा, हिरवळ आणि शांतता… 'हे' ठिकाण पाहिलं नाही तर काय पाहिलं?; पर्यटकांनो, एकदा येऊन तर पाहा…

Sameer Amunekar

पावसाळा

पावसाळा आला की निसर्गाची शोभा अधिकच खुलते. पावसाचे सरी, हिरवीगार डोंगररांगा आणि त्यातून खळाळत कोसळणारे धबधबे हीच तर खरी निसर्गसौंदर्याची अनुभूती. अशाच एका अप्रतिम ठिकाणाची आज आपण माहिती घेणार आहोत.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak

सावडाव धबधबा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून काहीच अंतरावर असलेला सावडाव धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak

कणकवली

सावडाव धबधबा हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील सावडाव गावाजवळ आहे. गोव्याच्या उत्तरेकडील भागातून अगदी दीड-ते-दोन तासांत तुम्ही इथे पोहोचू शकता.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak

पर्यटक

गोव्यात फिरायला आलेले पर्यटकही हे ठिकाण जवळ असल्यामुळे सहज या धबधब्याला भेट देऊ शकतात.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak

निसर्गसौंदर्य

पावसाळ्यात सावडाव धबधब्याचं सौंदर्य अक्षरशः वेड लावणारं असतं. डोंगरातून कोसळणारे पाणी, आजूबाजूचं जंगल आणि शुद्ध हवा हे सगळं मनाला शांत करणं तर देतंच, पण ‘नेचर थेरपी’चा उत्तम अनुभवही देतं.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak

फोटोग्राफी

फोटोग्राफीसाठी सावडाव हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. धबधब्याच्या पार्श्वभूमीवर, धुके आणि हिरवाई यामध्ये काढलेले फोटो नक्कीच लक्ष वेधून घेणारे असतात.

Savdav Waterfall In Konkan | Dainik Gomantak
Famous Waterfall In Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा