Thruxton 400: ट्रायम्फची नवी 'कॅफे रेसर' बाईक लवकरच होणार लॉन्च, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर!

Manish Jadhav

ट्रायम्फ

ट्रायम्फ (Triumph) कंपनी पुन्हा एकदा भारतातील रेट्रो बाईक (Retro Bike) सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांची नवी कॅफे रेसर बाईक 'थ्रक्सटन 400' नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Thruxton 400 | Dainik Gomantak

लॉन्च

ही नवी मोटरसायकल 6 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लॉन्च केली जाऊ शकते. स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400एक्स नंतर ही बजाजच्या मदतीने ट्रायम्फचे तिसरे प्रोडक्ट असेल.

Thruxton 400 | Dainik Gomantak

डिझाइन आणि क्लासिक लूक

थ्रक्सटन 400 ला टेस्टिंगदरम्यान अनेकदा पाहिले गेले आहे. ही बाईक कॅफे रेफरची स्टाइलिंग पुढे नेते आणि आता बंद झालेल्या थ्रक्सटन 1200च्या (Thruxton 1200) डिझाइनची आठवण करुन देते.

Thruxton 400 | Dainik Gomantak

इंजिन आणि पॉवर

ट्रायम्फने अजून तरी इंजिनबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, थ्रक्सटन 400 मध्ये स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400एक्स मधीलच 398 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन असेल अशी अपेक्षा आहे.

Thruxton 400 | Dainik Gomantak

स्पोर्टी लूक

थ्रक्सटन 400च्या स्पोर्टी लूकला साजेसे असे गियरिंग (Gearing) किंवा इंजिन ट्यूनिंगमध्ये (Engine Tuning) थोडे बदल केले जाण्याची शक्यता आहे, जे तिला अधिक आकर्षक आणि वेगवान बनवेल.

Thruxton 400 | Dainik Gomantak

आधुनिक हार्डवेअर

बाईकमध्ये पुढील बाजूस अपसाइड-डाउन फोर्क्स, मागे मोनो-शॉक आणि दोन्ही बाजूंना ड्युअल-चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक असतील.

Thruxton 400 | Dainik Gomantak

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाईल, जे राइडिंगचा अनुभव अधिक चांगला करेल आणि राइडरला आवश्यक माहिती सहजपणे उपलब्ध करेल.

Thruxton 400 | Dainik Gomantak

किंमत

थ्रक्सटन 400 ची एक्स-शोरुम किंमत सुमारे 2.70 लाख रुपये असू शकते.

Thruxton 400 | Dainik Gomantak

KL Rahul: केएल राहुल रचणार इतिहास; 'या' दोन भारतीय दिग्गजांचा रेकॉर्ड निशाण्यावर!

आणखी बघा