दैनिक गोमन्तक डिजिटल
नावाचा किंवा फोटोचा खास टच!आजकाल भावाचे नाव, टोपणनाव (उदा. Veere, Bro) किंवा लहानपणीचा फोटो असलेल्या लाकडी, ॲक्रेलिक किंवा मेटलच्या राख्यांना मोठी पसंती मिळतेय.
चांदीची 'इव्हिल आय' अन् लकी राखी, भावाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी 'इव्हिल आय' (Evil Eye) राखी आणि रक्षाबंधनानंतरही हातात ब्रेसलेटसारखी वापरता येणारी चांदीची (Silver) राखी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.
निसर्गप्रेमींसाठी 'इको-फ्रेंडली' राखी! ही राखी केवळ हातात बांधण्यासाठी नाही, तर सण झाल्यानंतर कुंडीत पेरल्यास त्यातून सुंदर रोपटे/झाड उगवते! सेंद्रिय कापूस आणि बिया वापरून ही बनवली जाते.
ट्रेडिशनल अन् रॉयल कुंदन-मोती राखी, जर भावाला क्लासिक आणि पारंपरिक लुक आवडत असेल, तर बारीक मोती, थ्रेड वर्क आणि कुंदन स्टोन असलेली हँडमेड राखी उत्तम पर्याय आहे.
लहानांसाठी कार्टून अन् LED राखी! घरातील लहान भावांसाठी डोरेमोन, छोटा भीम, स्पायडरमॅन किंवा लाईट लागणाऱ्या (LED) राख्या बच्चेकंपनीला भलत्याच आकर्षित करतात.
लेदर ब्रेसलेट अन् वहिनीसाठी 'लूंबा'! मॉडर्न लुकसाठी लेदर ब्रेसलेट राखी आणि दादासोबत वाहिनीसाठी
'भाभी/लूंबा राखी' (Lumba Rakhi) जोडपे म्हणून बांधण्याचा ट्रेंड सध्या तुफान हिट आहे!