Hidden Places in Goa: गर्दीला म्हणा बाय-बाय! गोव्यातील 'या' 7 निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

बटरफ्लाय बीच

बटरफ्लाय बीच - निसर्गाचा गुप्त खजिना, दक्षिण गोव्यात असलेला हा बीच त्याच्या अर्धचंद्राकृती आकारासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे बोट प्रवासादरम्यान डॉल्फिन आणि विविध फुलपाखरे पाहायला मिळतात.

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

नेट्रावळी बुडबुड्यांचे तळे

नेट्रावळीचे रहस्यमयी बुडबुड्यांचे तळे, सांगे तालुक्यातील या गोपीनाथ मंदिरातील तळ्यात एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. टाळ्या वाजवल्यावर तळ्यातून पाण्याचे नैसर्गिक बुडबुडे वर येतात!

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

काकलेम बीच

काकलेम बीच - गुप्त अन् शांत किनारा, टेकडीवरून खाली उतरून जावे लागणाऱ्या या किनाऱ्यावर थेट समुद्रात कोसळणारा लहान धबधबा हे मुख्य आकर्षण आहे. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम स्पॉट आहे.

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

दिव्यार बेट

दिव्यार बेट - जुन्या गोव्याची शांत सफर, मांडवी नदीतून फेरीबोटीने (Ferry) या बेटावर जाता येते. पोर्तुगीज शैलीतील रंगीबेरंगी घरे, हिरवीगार भातशेती आणि शांत रस्ते तुमचे मन मोहून टाकतात.

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

चोरला घाट आणि हरवळे धबधबा

चोरला घाट अन् शांत हरवळे धबधबा, समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त गोव्याचे हिरवेगार रूप पाहायचे असेल, तर चोरला घाटातील निसर्ग अन् ऐतिहासिक हरवळे धबधबा आणि प्राचीन गुहा ही एक उत्तम जागा आहे.

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

कोराओ बेट

कोराओ बेट अन् कोराओ बेट येथील पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी उत्तम आहे,

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

केरी बीच

तर उत्तर गोव्याच्या टोकाला असलेला केरी (Querim) बीच त्याच्या शांतता आणि पाईनच्या झाडांसाठी ओळखला जातो

Hidden Places in Goa | Dainik Gomantak

घरच्या घरी बनवा 'हे' 7 नॅचरल फेस पॅक

Natural Face Packs | Dainik Gomantak
येथे क्लिक करा