Sameer Amunekar
डोंगर भागात ट्रेकिंगसाठी जाणं ही एक रोमांचक आणि स्फूर्तिदायक गोष्ट असते. मात्र सुरक्षितता आणि अनुभव अधिक चांगला होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
ट्रेकिंगसाठी विशेष ट्रेकिंग शूज घालणे महत्त्वाचे असते. साधे स्पोर्ट्स शूज चिखलात किंवा दगडांवर घसरू शकतात. त्यामुळे ग्रिप चांगली असलेले शूज घालावेत.
ट्रेकच्या आधी त्या परिसराचं हवामान जाणून घ्या. पावसाळी किंवा धुके असलेली हवामान परिस्थिती ट्रेकिंगसाठी धोकादायक ठरू शकते.
पाण्याची बाटली, सुकामेवेचं छोटं पॅक, फर्स्ट एड किट, टॉर्च किंवा हेडलॅम्प, पॉवर बँक सोबत ठेवा.
नेहमी ग्रुपमध्ये ट्रेक करा. काही आपत्कालीन परिस्थिती आली तर मदत मिळू शकते. एखाद्याला अनुभव असेल, तर तो ग्रुपसाठी मार्गदर्शक ठरतो.
परिचित नसलेल्या मार्गावर स्थानिक गाईडसोबत ट्रेकिंग करणे सुरक्षित असते. त्यांनी ट्रेकचा मार्ग, धोक्याचे ठिकाणे, वन्यजीव याबद्दल माहिती असते.
प्लास्टिक, चिप्सच्या रिकाम्या पाकिटांचा कचरा डोंगरात टाकू नका. निसर्ग तसाच स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही प्रत्येक ट्रेकरची जबाबदारी आहे.