Sameer Amunekar
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा आपल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि निसर्गसंपत्तीकरता प्रसिध्द आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला 'निवती बीच' हा एक अप्रतिम आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे.
निवती बीच पर्यटकांचं आवडत ठिकाणं आहे. वेंगुर्ला तालुक्यातील हा समुद्रकिनारा, निवती गावाजवळ आहे.
निवती बीचच्या सौंदर्याची तुलना करता येईल ती एखाद्या चित्रातल्या स्वप्नवत स्थळाशी. येथे स्वच्छ, पांढरसर वाळूचा किनारा आणि निळसर पाणी हे पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.
गर्दीपासून लांब असलेला हा बीच, शांततेची आणि निवांतपणाची अनुभूती देतो. येथे संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्याचा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
निवती समुद्रकिनाऱ्यालगत नारळाच्या बागा, खाडी किनारी लहानशा होड्या, आणि पारंपरिक मच्छीमारांची वस्ती यामुळे इथे एक वेगळीच ग्रामीण आणि सजीव संस्कृती पाहायला मिळते.