Travis Head Record: ट्रॅव्हिस हेडचा ॲशेसमध्ये धमाका! वादळी शतक ठोकून रचला इतिहास

Manish Jadhav

ट्रॅव्हिस हेड

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ येथे सुरु असलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने गाजवला.

Travis Head | Dainik Gomantak

वादळी शतक

हेडने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अवघ्या 69 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हेडच्या या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 205 धावांचे लक्ष्य गाठणे सोपे झाले.

Travis Head | Dainik Gomantak

सर्वात वेगवान शतक

हेडचे हे शतक ॲशेसच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. त्याने 1902 मध्ये 76 चेंडूंमध्ये शतक करणाऱ्या गिलबर्ट जेसॉपचा विक्रम मोडला.

Travis Head | Dainik Gomantak

ॲडम गिलख्रिस्ट अव्वल

ॲशेसमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक करण्याचा विक्रम अजूनही ॲडम गिलख्रिस्ट याच्या नावावर आहे. त्याने 2006-07 मध्ये पर्थमध्ये 57 चेंडूंमध्ये शतक केले होते.

Travis Head | Dainik Gomantak

लक्ष्याचा पाठलाग करताना विक्रम

ट्रॅव्हिस हेडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग (Target Chase) करताना सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

Travis Head | Dainik Gomantak

संयुक्त तिसरे वेगवान शतक

हेडचे हे शतक ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्तपणे तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या 69 चेंडूंमधील शतकाची बरोबरी साधली.

Travis Head | Dainik Gomantak

पहिली वेळ सलामीला फलंदाजी

ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरण्याची संधी ट्रॅव्हिस हेडला मिळाली आणि त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.

Travis Head | Dainik Gomantak

4000 धावांचा टप्पा

या शतकी खेळीदरम्यान ट्रॅव्हिस हेडने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 4000 धावांचा टप्पा देखील पूर्ण केला. हे हेडचे कसोटी कारकिर्दीतील 10वे शतक आहे.

Travis Head | Dainik Gomantak

Visapur Fort: विशाल पठार, मजबूत तटबंदी आणि मराठा स्थापत्यकलेचं गौरवशाली वैभव 'विसापूर किल्ला'

आणखी बघा