Sameer Amunekar
आलं मळमळ आणि उलटीवर नैसर्गिक उपाय मानलं जातं. प्रवासाच्या आधी थोडं आलं चावून खा किंवा आल्याचा चहा प्या.
लिंबू कापून त्यावर मीठ टाकून चोखल्याने मळमळ कमी होते आणि प्रवास आरामदायक होतो.
पुदिना मळमळ आणि पोटदुखीवर उत्तम उपाय आहे. पुदिन्याचा अर्क घ्या किंवा ताजं पान चावून खा.
लवंग, इलायची किंवा सुगंधी ऑइलचा (जसं की लॅव्हेंडर) वास घेतल्याने मळमळ कमी होते.
बंद गाडीत हवा कमी मिळाल्यास मळमळ वाढू शकते. त्यामुळे खिडकीजवळ बसा आणि ताजी हवा घ्या.
प्रवासाच्या आधी फार तेलकट किंवा मसालेदार अन्न टाळा. थोडं हलकं खा – जसं की केळं, ब्रेड किंवा खिचडी.