Sameer Amunekar
एक चमचा तुरटी पावडर, थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.
तुरटीमध्ये लिंबाचा रस मिसळून पिंपल्सच्या जागी हलक्या हाताने लावा. अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे पिंपल्स लवकर सुकतात.
तुरटीचे पाणी (उकळून थंड केलेले) टोनरप्रमाणे वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि रोमछिद्रे घट्ट होतात.
पाण्यात थोडी तुरटी मिसळून पेस्ट बनवा आणि फक्त पिंपल्सवर लावा. रात्रभर ठेवल्यास सूज आणि लालसरपणा कमी होतो.
अर्धा चमचा तुरटी गरम पाण्यात मिसळा आणि त्या पाण्याने चेहरा धुवा. दिवसातून एकदा केल्यास त्वचेत स्वच्छता टिकते.
बाजारात मिळणाऱ्या तुरटीयुक्त हर्बल साबणांचा वापर केल्यास त्वचेवर सतत स्वच्छता आणि अँटीसेप्टिक परिणाम राहतो.
दररोज वापरणे टाळा. आठवड्यातून 2-3 वेळा वापर पुरेसा आहे. वापरण्याआधी त्वचेची अॅलर्जी चाचणी (patch test) अवश्य करा.