Akshata Chhatre
जर तुम्ही डोंगराळ भागात जात असाल, तर उत्तम दर्जाचे उबदार कपडे सोबत ठेवा. थंडीमुळे फ्लू आणि तापाचा धोका असतो, त्यामुळे स्वतःला नीट झाकून घ्या.
हवामान बदलल्यास डोकेदुखी, ताप किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रथमोपचाराच्या गोळ्या आणि तुमची नियमित औषधे सोबत ठेवायला विसरू नका.
प्रवासात प्रत्येक वेळी हात धुण्यासाठी पाणी मिळेलच असं नाही. अशा वेळी सॅनिटायझर जंतू आणि व्हायरसपासून तुमचा बचाव करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
प्रत्येक ठिकाणचे पाणी स्वच्छ असेलच असं नाही. अस्वच्छ पाण्यामुळे पोट बिघडू शकते, त्यामुळे प्रवासात नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा.
प्रवासातील थकवा दूर करण्यासाठी ड्राय फ्रूट्स, भाजलेले मखाणे किंवा एनर्जी बार सोबत ठेवा. यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी टिकून राहते.
गर्दीच्या ठिकाणी किंवा थंड हवेत मास्क वापरल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. स्वतःला आणि इतरांना आजारी पडण्यापासून वाचवण्यासाठी मास्क नक्की वापरा.