Manish Jadhav
जुलैमध्ये रिचार्ज प्लॅन महाग झाल्यामुळे Jio, Airtel आणि Vi चे वापरकर्ते संतप्त झाले होते, परंतु आता असे दिसते आहे की, करोडो मोबाइल वापरकर्त्यांना लवकरच स्वस्त रिचार्ज प्लॅनची भेट मिळू शकते.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण उर्फ TRAI ने अलीकडेच सर्व दूरसंचार कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी एसएमएस आणि कॉलिंग योजना आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रायच्या या आदेशाचा फायदा अशा लोकांना होणार आहे ज्यांच्याकडे दोन मोबाईल नंबर आहेत किंवा जे फीचर फोन वापरतात. फीचर फोन वापरणारे बहुतांश ग्राहक कॉलिंग आणि एसएमएस वापरतात, अशा लोकांचा डेटा खूप कमी वापरला जातो, एकूणच, करोडो मोबाइल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा अच्छे दिन येऊ शकतात.
Jio, Airtel, BSNL आणि Vodafone Idea कडे वापरकर्त्यांसाठी डेटा प्लॅन आणि डेटा प्लस व्हॉइस प्लॅन उपलब्ध आहेत. असे बरेच लोक आहेत जे फोन फक्त कॉल किंवा एसएमएससाठी वापरतात. अशा परिस्थितीत आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी फक्त व्हॉइस आणि एसएमएस पॅक जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.