Manish Jadhav
प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी 23 डिसेंबर रोजी या जगाचा निरोप घेतला.
ते या जगात नसले तरी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव सदैव अमर राहील. रुपेरी पडदा असो की टीव्हीचा पडदा, श्याम बेनेगल यांनी सर्वत्र आपली छाप सोडली.
जेव्हा जेव्हा श्याम बेनेगल यांचे नाव घेतले जाते तेव्हा 80 च्या दशकातील लोकप्रिय टीव्ही मालिका 'भारत एक खोज'चे नाव नक्कीच डोळ्यासमोर येते. हा त्यांचा सर्वात मोठा आणि लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम होता, जो 1988 ते 1989 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाला होता.
श्याम बेनेगल यांनी ‘भारत एक खोज’ मालिका रुपेरी पडद्यावर उत्तम आणि दमदार पद्धतीने सादर केली होती.
विविधतेने नटलेल्या भारताच्या इतिहासाचे चलचित्र मांडणारा एखादा टीव्ही शो असावा असा विचार भारत सरकारला आला होता, मात्र हा शो कोण बनवणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. याचदरम्यान बेनेगल यांचे नाव समोर आले.
बेनेगल यांनी भारत सरकारची ऑफर स्वीकारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलेल्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकावर आधारित भारताचा इतिहास छोट्या पडद्यावर सादर करण्याचे काम सुरु केले.
'भारत एक खोज'ची स्क्रिप्ट अतुल तिवारी, शमा झैदी यांच्यासह 25 जणांनी मिळून लिहिली होती. याशिवाय श्याम बेनेगल यांच्या टीममध्ये 15 इतिहासकार होते, जे लेखकांच्या टीमला मार्गदर्शन करायचे. तसेच, 10 हजारांहून अधिक पुस्तकांचीही मदत घेण्यात आली.