Sameer Amunekar
वारंवार नियमभंग महागात पडू शकतो
रस्ते वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास केवळ दंडच नाही, तर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरही कारवाई होऊ शकते.
धोक्याची घंटा
नवीन नियमांनुसार एका कॅलेंडर वर्षात 5 किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर वाहतूक नियमभंग झाल्यास लायसन्स निलंबित किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.
कोणते नियमभंग धोकादायक?
वारंवार वेगमर्यादा ओलांडणे, रेड सिग्नल तोडणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, हेल्मेट किंवा सीटबेल्ट नियमांचे उल्लंघन, धोकादायक ड्रायव्हिंग
कोर्ट आणि RTO दोघांनाही अधिकार
मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर किंवा वारंवार नियमभंग करणाऱ्यांचे लायसन्स निलंबित किंवा रद्द करण्याचा अधिकार न्यायालय आणि परवाना प्राधिकरणाकडे आहे.
ई-चलन रेकॉर्डवर ठेवले जाते
आज सर्व ई-चलन डिजिटल प्रणालीशी जोडलेले असल्याने वारंवार होणारे नियमभंग सहज ट्रॅक केले जातात.
लायसन्स परत मिळवण्यासाठी अडचण
लायसन्स निलंबित झाल्यानंतर काही प्रकरणांत पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागू शकते.
सुरक्षित वाहनचालना हाच सर्वोत्तम पर्याय
वेळेवर चलन भरणे पुरेसे नाही. वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंड, लायसन्सवरील कारवाई आणि अपघात या तिन्ही गोष्टी टाळता येतात.