Sameer Amunekar
दोन चमचे कच्च्या दुधात एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा, त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ होईल.
दोन चमचे बेसन आणि एक चमचा दही एकत्र करून पेस्ट बनवा. हे उटणे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक देते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर थोडे साजूक तूप लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे कोरडी त्वचा मऊ होते आणि नैसर्गिक पोषण मिळते.
ताज्या कोरफडीचा गर रोज रात्री चेहऱ्यावर लावा. कोरफड त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा मऊ व नितळ ठेवण्यास मदत करते.
चंदन पावडरमध्ये गुलाब जल मिसळून लावल्याने त्वचेचा दाह कमी होतो आणि त्वचा मऊ व फ्रेश राहते. उन्हाळ्याच्या दिवसांत हा उपाय अत्यंत गुणकारी आहे.
पिकलेल्या केळीचा गर स्मॅश करून त्यात थोडे मध टाका. हे मिश्रण चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवा, यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते आणि त्वचा मऊ होते.
आंघोळीच्या आधी शुद्ध खोबरेल तेलाने त्वचेवर मसाज करा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते आणि त्वचेचा पोत सुधारते.