Pramod Yadav
दोन चार्टर्ड विमानांमधून बुधवारी एकूण ३४९ विदेशी पर्यटक मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्यात दाखल झाले.
पहिले विमान सकाळी नऊ वाजता उतरले. त्यात २१० व दुसऱ्या विमानातून १३९ मिळून ३४९ विदेशी पर्यटकांचे आगमन झाले.
या सर्व पर्यटकांचे विमानतळावर जोरदारपणे स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळ परिसरात गोव्याविषयी माहिती देणारे फलक, प्रतिमा पाहून पर्यटक भारावलेले दिसून आले.
चार्टर्ड विमानांतून पर्यटक दाखल झाल्याने पर्यटन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विमानतळावर उतरल्यानंतर हे पर्यटक गोव्याच्या वेगवेगळ्या किनारी व अन्य भागात रवाना झाले.
पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी पर्यटकांचे स्वागत करतातान पर्यटकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवण्याचा सरकार प्रयत्न असल्याचे सांगितले.
जगभरातून गोव्यात पर्यटक यावेत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी खात्यातर्फे विविध माध्यमांतून व उपक्रमांतून प्रयत्न केला जात आहे.
पर्यटकांचे मोपा विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य तसेच लोककला सादर करण्यात आली.