Manish Jadhav
गोवा त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध तर आहेच, पण इथली खाद्यसंस्कृतीही तुम्हाला भुरळ पाडते.
तुम्ही तुमच्या गोवा ट्रीपमध्ये गोवन फूडचा नक्की आस्वाद घेतला पाहिजे, यामध्ये मग फीश थाळी, गडबड आईस्क्रीम, रोस आम्लेट इत्यादी... याशिवाय, ब्रेडपासून बनवण्यात येणाऱ्या डीश देखील गोव्यात फेमस आहेत.
आज (1 ऑक्टोबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून ब्रेडपासून बनवण्यात येणाऱ्या गोव्यातील फेमस डीशबद्दल जाणून घेणार आहोत.
पोई ही एक पोर्तुगीज डीश आहे. ती ब्रेडने बनते. या पदार्थाला बनवण्यासाठी ब्रेडबरोबरच ताडीचा देखील उपयोग केला जातो.
गोव्यातील लोक या पदार्थाला खूप पसंत करतात. ही डीश वेगळी असल्याने लोक तिचा आस्वाद घ्यायला विसरत नाहीत. तुम्हीही गोव्यात या पदार्थाचा नक्की आस्वाद घेतला पाहिजे.
कोरिस पाव हे स्ट्रिट फूड म्हणून गोव्यात परिचित आहे. ते पर्यटकांना आवडते. हे एक पोर्तुगीज पदार्थ असून त्याला बनवण्यासाठी ब्रेड, मिर्ची आणि पोर्क सॉसेजचा वापर केला जातो.