Sameer Amunekar
इतिहासातील बखरींच्या नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बळकट करण्यासाठी तब्बल १११ नवीन किल्ल्यांची उभारणी करून अभेद्य संरक्षणव्यवस्था उभी केली.
पूर्वी अस्तित्वात असलेल्या सुमारे ४९ किल्ल्यांची दुरुस्ती करून त्यांना नवसंजीवनी देत अधिक भक्कम, सुसज्ज आणि अभेद्य बनविण्यात आले.
याप्रमाणे सुमारे १६० किल्ल्यांचे अभेद्य जाळे स्वराज्याभोवती उभे राहिले. त्या काळात इतक्या व्यापक आणि सुसूत्र दुर्गव्यवस्थेची निर्मिती ही खरोखरच विलक्षण कामगिरी होती.
सह्याद्रीच्या डोंगररांगांवर वसलेले किल्ले उदा. राजगड आणि प्रतापगड शत्रूसाठी जिंकणे अत्यंत कठीण होते.
समुद्रकिनाऱ्यावर उभारलेले किल्ले उदा. सिंधुदुर्ग किल्ला आरमारी संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरले.
मैदानी भागातील किल्ले प्रशासन आणि संरक्षणासाठी उपयोगी होते.
प्रत्येक किल्ला हा फक्त बांधकाम नव्हता, तर एक रणनीतीचा भाग होता. भूगोल, पाण्याची सोय, अन्नसाठा, गुप्त दरवाजे, बुरुज प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आखली जात होती.