Sameer Amunekar
त्वचेवरची धूळ, तेल आणि घाण काढण्यासाठी सौम्य (sulfate-free) फेसवॉश वापरा. खूप कडक क्लेन्सरमुळे त्वचा कोरडी होऊन पिंपल्स वाढू शकतात.
नीममध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात आणि हळद सूज कमी करते. 10–15 मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा. पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी अॅलोवेरा जेल हलक्या हाताने लावा. ते त्वचेची दुरुस्ती करते आणि काळपट डाग फिके करण्यात मदत करते.
सूर्यकिरणांमुळे डाग गडद होतात. घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक आहे.
दररोज किमान 8–10 ग्लास पाणी प्या. फळे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनयुक्त आहार त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
पिंपल्स दाबल्यास जखम होऊन काळे डाग राहू शकतात. त्वचेला स्वतः बरे होऊ द्या.
दररोज 7–8 तास झोप घ्या. जास्त ताणामुळे हार्मोन्स बिघडतात आणि पिंपल्स वाढतात.